शिर्डी संस्थानच्या निधीतून 159 शाळा खोल्यांना निधी

नगर: राज्य सरकारच्या इशारावर शिर्डी संस्थानचा निधी खिरापतीप्रमाणे राज्यभर वाटला जात होत आणि आजही तसेच होत आहे. नगर जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांना निधी मागूनही त्याकडे दुर्लक्ष होत होते. नगरच्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. सरकारने शिर्डी संस्थामधून जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांसाठी 30 कोटींचा निधी मंजूर करत त्यातील पहिल्या हप्त्याला मंजूरी दिली होती. सरकारच्या आदेशाला अंमलबजावणीला तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागला आहे.

राज्य सरकारने विशेष आदेश काढत शिर्डी संस्थांमधून नगर जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांसाठी 30 कोटींचा निधी मंजूर केला होता. यातील पहिला हप्ता दहा कोटी रुपयांचा देण्यात येणार आहे. शिर्डी संस्थान जिल्हा परिषदेला थेट निधी न देता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून गरज असणाऱ्या गावांची यादी मागविली होती. या यादीतून संस्थाने निवडून शाळा खोल्यांना मंजूरी दिली आहे. संस्थांने मंजूर केलेल्या 10 कोटींच्या निधीत 159 शाळाखोल्या बांधता येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला 1 हजार 92 शाळा खोल्यांची गरज आहे. या शाळा खोल्यांची यादी राज्य सरकार आणि शिर्डी संस्थानला सादर करण्यात आलेली आहे. या यादीतून शिर्डी संस्थानने 159 शाळा खोल्यांना मंजूरी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुकानिहाय दुरुस्तासाठी मंजूर झालेल्या शाळाखोल्या

नेवासा : रस्तापूर, खुपटी, बाभुळवेढा, जेऊर हैबती, गणेशवाडी, गळनिंब, पिंप्रीशहाली, फत्तेपूर, नारायणवाडी, पाचुंदा. कोपरगाव : बोरावके वस्ती, कारवाडी, कोकमठाण, डांगेवाडी, भास्करवस्ती, खिर्डी गणेश, ओगदी, शिवाजीनगर, रांजणगाव देशमुख, घोयेगाव, रेलवाडी कोकमठाण, अंचलगाव, करंजी, परजणेवस्ती संवत्सर, शिंदेवस्ती पढेगाव, कान्हेगाव, धोत्रे, चासनळी, कारवाडी कोकमठाण, नाटेगाव, पढेगाव, देर्डे चांदवड, पानमळा. संगमनेर : अंभोरे, चिंचेवाडी, साकुर, कासार दुमाला, दे. ख. आखाडा, डिग्रज, कौठे धांदरफळ, गुंजाळवाडी, संगमनेर खू., भागवतवाडी. श्रीरामपूर : सूतगिरणी, हरिहरनगर उर्दू, अशोकनगर उर्दू, वांगी खुर्द, खानापूर, गळनिंब, खोकर, फत्याबाद, खंडाळा, भेर्दापूर, गोवर्धनपूर, दिघी. अकोले : गणोरे, नायकरवाडी, हिवरगाव आंबरे, शेलद, रेडे, धामणवड पाटीलवाडी, शिरपुंजे देवचीवाडी, तांभोळ, खडकी खुर्द, देवठाण. राहुरी : जुंदरेवाडी, लाख, मालुंजे खुर्द, गोटुंबे आखाडा, हनुमानवाडी, करंजगाव, बाभुळगाव, खडांबे बु., महारुख वस्ती, डुक्रेवाडी, आंग्रेवाडी, पुलवाडी, कोकाटेवस्ती, रामपूर. राहाता : शिंगवे जाधव वस्ती, पुणतांबा, कोकणेवस्ती, सदाफळ क्‍लास, वाळकी, इनामके वस्ती, लक्ष्मीवाडी, केलवड, मोठेबाबा, अस्तगांव मराठी. श्रीगोंदा : कोकणगाव, येळपणे, वेळू, चिंभळा, ढोकराई, घारगाव, दत्तवाडी, म्हसे, बांगर्डे, पिंपळगाव पिसा. जामखेड : सातेफळ, हापटेवाडी, फाळकेवाडी, इनामवस्ती, नाहुली, पारेवाडी, कडभनवाडी, जातेगाव, मोहरी, देवकरवाडी. नगर : खांडके, सारोळा बद्दी, भोरवाडी, नेप्ती, चिचोंडी पाटील, माथणी, पदमपूरवाडी, खातगाव टाकळी, देहेरे, धनगरवाडी. कर्जत : कोरेगाव, राशीन, टाकळी खंडेश्‍वरी, पिंपळवाडी, तिखी, घुमरी, दिघी, कर्जत शहर, शिंदेवाडी, भोसे. पाथर्डी : मोहटे, खरवंडी कासार, कळसपिंप्री, साकेगाव, सुसरे, टाकळी मानूर, धामणगाव, खोजेवाडी, करंजी, मिरी.
शेवगाव : कऱ्हेटाकळी, शहरटाकळी, सामनगाव, मजलेशहर, खामगाव उर्दू, चापडगाव, ढोरजळगाव, मुंगी, राखेंफळ, राक्षी. पारनेर : वाळवणे, घाणेगाव, अळकुटी, पवळदरा, पारनेर मुली, वरखेड मळा, गणेशवाडी रायतळे, वडनेर, कळस, डेरेशिवार.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)