शिर्डी संस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

मुंबई – राज्य सरकारने राज्यातील मोठ्या मंदिराच्या अध्यक्षांना अध्यक्षपद बहाल करण्याचा सपाटा लावला आहे. प्रभादेवी येथील श्री सिध्दीविनायक मंदिरापाठोपाठ शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनाही राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. हावरे यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश विधि आणि न्याय विभागाने जारी केला आहे.

राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाल्याने हावरे यांना समितीच्या मुख्यालयात कार्यालय, दौ-यावर असताना शासकीय वाहन, निवास व्यवस्था, मानधन तसेच भत्ते आदी सुविधा मिळणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून सुरेश हावरे यांनी सामाजिक कार्यावर भर दिला आहे. त्यांनी लोकसहभागातून शिर्डीच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. शिर्डीला येणाऱ्या भक्तांनी रक्तदान करावे यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली असून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)