शिर्डी शहरातील वाहतूक सुरळीत न झाल्या आंदोलन

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने इशारा
शिर्डी – शिर्डी शहरातील बेशिस्त वाहतुकीत सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष दिपक गोंदकर यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात गोंदकर यांनी म्हटले आहे,की शिर्डी शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी अवजड वाहने निमगाव ते पिंपरी निर्मल या बाह्यवळण मार्गाने वळविण्यात आली असतांना देखील शनिवार, रविवार तसेच सलग सुट्यामुळे होणाऱ्या गर्दीच्या वेळी तसेच गर्दी नसतांनाही वारंवार वाहतुकीची कोंडी होते. शहरात जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावर वाहने उभी करून अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. त्यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होऊन त्याचा त्रास शिर्डीकरांबरोबरच बाहेरगावहून येणाऱ्या साई भक्तांना सहन करावा लागत आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. सध्या शाळा महाविद्यालये सुरु झाले असून विद्यार्थ्यांच्या बसला सुद्धा या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात पुरेसे वाहन तळ असतांनाही लेंडी नाला रोड, नांदुर्खी रोड, कनकुरी रोड, नवीन प्रसादालायाकडे जाण्याऱ्या रस्त्यावर वाहने आडवी तिडवी लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जातो. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी स्वतंत्र वाहतुक कक्षाची उभारणी करण्यात आलेली आहे. मात्र त्याचा पदभार अतिरिक्त पोलीस निरीक्षकांकडे असल्याने वाहतूक विभागावर नियंत्रण ठेवण्यास सपशेल अपयशी ठरले आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षकांसह पोलीस पथक सतत कार्यान्वित असणे गरजेचे आहे.या वाहतूक शाखेत साईबाबा संस्थानने स्वतंत्र मोटार क्रेन दिले असून नगर मनमाड महामार्ग व्यतिरिक्त कुठेही कारवाई करतांना दिसत नाही. सध्या शिर्डी वाहतूक कक्षात नव्याने वाहतूक पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात यावी. बेशिस्त अवैध, वाहतुकीत सुधारणा न झाल्यास जेष्ठ नेते पतिंगराव शेळके, रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, महेंद्र शेळके, निलेश कोते, बाबासाहेब कोते, संदीप सोनवणे, भागवत कोते, सुनील गोंदकर, अमित शेळके, चंद्रकांत गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा दीपक गोंदकर यांनी दिला. या पत्रकावर गणेश गोंदकर, प्रकाश गोंदकर, अभिषेक शेळके, प्रसाद पाटील, राकेश कोते, विशाल भडांगे, विशाल कोते, साई कोतकर, अमोल बानाईत, सिद्धार्थ गोतीस, जावेद शेख, गंगाधर वाघ, सईद शेख, शायद सय्यद यांच्या सह्या आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)