शिर्डी, राहाता शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

नगराध्यक्ष पिपाडा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
शिर्डी – शिर्डी व राहाता शहरातुन रात्रीच्यावेळी अवजड वाहने सोडण्यात येत असून या वाहनधारकांकडुन रोज लाखोंची वसुली करण्यात येत आहे. ही वसुली तातडीने बंद करावी, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहाता पालिकेच्या नगराध्यक्ष ममता पिपाडा यांनी शिर्डी येथे दिले. यावेळी डॉ.राजेंद्र पिपाडा उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचा पिपाडा यांनी सत्कार केला.
कोल्हार-कोपरगाव बायपास खराब झाल्यामुळे वाहतुक कोल्हार तसेच कोपरगाव चौफुली येथुन वळवली जाते. परंतु तसे न करता रात्री 9 ते सकाळी 7 पर्यंत मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने राहाता व शिर्डी शहरातुन पोलिसांमार्फत वसुली करुन सोडली जातात. खराब बायपास रस्त्याच्या नावाखाली पोलिसांमार्फत अवजड वाहनांकडुन जणुकाही टोल वसुली करुन वाहनधारकांची लुट केली जाते. परंतु जड वाहतुक शहरातुन सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. भरधाव येणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या सामान्य जनतेच्या जीवीतालाही धोका निर्माण झाला आहे. शिर्डी हे एक आंतरराष्ट्रीय धार्मिक ठिकाण आहे. येथे रोज लाखोंच्या संख्येने भाविक भक्त येतात. परिसरातुनही मोठ्या प्रमाणावर भक्तजन दर्शनासाठी जातात. विविध ठिकाणांहुन पायी दिंड्याही या शहरांमधुन जात असतात. केवळ लाखो रुपये कमविण्याच्या लालसेपोटी शहरातुन अवजड वाहने सोडुन नागरीकांचे प्राण संकटात टाकायचे हे योग्य नाही. तात्काळ या प्रकाराची चौकशी करुन हा प्रकार थांबवावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आलेली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)