शिर्डी आमचीच, नगर दक्षिण कॉंग्रेसला मिळावे- शेलार

नगर: लोकसभेची शिर्डी मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्षाची आहे. त्या ठिकाणी कॉंग्रेसकडून लढणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्याच सोबत गेल्या तीन निवडणुकांमध्ये नगर दक्षिणेत राष्ट्रवादीला पराभव पत्कारावा लागलेला आहे. यामुळे ही जागा कॉंग्रेसला मिळावी, दक्षिणेच्या एका जागेमुळे राज्याचे चित्र बदलेल, असा विश्‍वास कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी व्यक्त केला.

नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. तीन राज्यात झालेल्या निकालामुळे कॉंग्रेस पक्षाला चांगले दिवस येणार आहे. रायफेल विमा खरेदी प्रकरण हे देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे. सरकार शेतकऱ्यांना 100 अटी टाकूून कर्जमाफी देत असून ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत एक-एक जाग महत्वाची असल्याने नगर दक्षिणेची जागा कॉंग्रेसला देणे आवश्‍यक आहे. या ठिकाणी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते डॉ. सुजय विखे यांचा संपर्क मोठा असल्याने त्यांच्यासाठी राष्ट्रवादीने ही जागा सोडावी. तसेच गेल्या तीन निवडणुकांमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी पराभूत झालेली असल्याने नगर दक्षिण कॉंग्रेसला देणे संयुक्त असल्याचा दावा शेलार यांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिर्डी मतदारसंघ हा कॉंग्रेसचा असून तो कॉंग्रेसकडे राहणार आहे. या ठिकाणी निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. योग्य उमदेवारांच्या बाबत पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील काही विद्यमान आणि काही माजी आमदार कॉंग्रेसच्या संपर्कात असून योग्य वेळी ते पक्षात प्रवेश घेणार आहेत.

डॉ. विखे पाटील पक्ष सोडणार नाहीत

लोकसभेच्या उमेदवारीसाठी डॉ. सुजय विखे पक्ष सोडणार असल्याचे बोलत असल्याबाबत शेलार यांच्याकडे विचारणा केली असता, कॉंग्रेसला चांगले दिवस येणार असल्याने डॉ. विखे पक्ष सोडणार नाहीत, असा विश्‍वास शेलार यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)