शिर्डीत रामनवमीला लाखो भाविकांचे साईदर्शन 

साईसच्चरित ग्रंथाची सवाद्य मिरवणूक
शिर्डी – श्रीरामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी रात्रभर मंदिर दर्शनाकरिता खुलेअसल्यामुळे लाखो भाविकांनी साईबाबांच्या समाधीचेदर्शन घेतले.
रविवारी पहाटेकाकड आरतीनंतर अखंड पारायणाची समाप्ती झाली. श्री साईसच्चरित या ग्रंथाची व्दारकामाईतून गुरुस्थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संस्थानचे विश्‍वस्त बिपीन कोल्हे यांनी वीणा, विश्‍वस्त मोहन जयकर व उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी श्रींची प्रतिमा व नगराध्यक्षा योगिता शेळके यांनी पोथी घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला.
यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, विश्‍वस्त प्रताप भोसले, डॉ. मनीषा कायंदे, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, सरस्वती वाकचौरे, कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्‍त उपस्थित होते.
संस्थानचे विश्‍वस्त प्रताप भोसले व त्यांची पत्नी अश्‍विनी भोसले यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी कावडीचे पूजन केले. विश्‍वस्त मोहन जयकर, प्रताप भोसले व नगराध्यक्षा योगिता शेळके यांच्या हस्ते व्दारकामाई मंदिरातील गव्हाच्या पोत्याची पूजा करण्यात आली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेव त्यांच्या पत्नी शालिनी विखे यांनी साईबाबांच्या समाधीचेदर्शन घेतले.
रविवारी सकाळी 10 वाजता विक्रम नांदेडकर यांचेश्रीरामजन्मावर कीर्तन झाले. माध्यान्ह आरतीपूर्वी रासने कुटुंबीय व देशपांडे कुटुंबियांच्या वतीने नवीन निशाणांची विधीवत पूजा करण्यात आली. दुपारी 4 वाजता मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी 5 वाजता श्रींच्या रथाची शिर्डीतून मिरवणूक काढण्यात आली.
साईभक्‍त स्नेहा शर्मायांच्या देणगीतून समाधी मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मुंबई येथील व्दारकामाई मंडळाने उभारलेले श्रीशंकर भगवान व श्री साईबाबांच्या मर्तूीचा देखावा असलेलेमहाव्दार, मंदिर व परिसरात केलेली विद्युत रोषणाई उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. सोमवारी उत्सवाच्या सांगतादिनी पहाटे 5 वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी साडेसहा वाजता गुरुस्थान मंदिरामध्ये रुद्राभिषेक, सकाळी साडेदहा वाजता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12.10 वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी साडेसहा वाजता धुपारती होईल. रात्री 7 ते 10 या वेळेत श्रीधर फडके यांचा गीत रामायण कार्यक्रम होणार आहे. रात्री साडेदहा वाजता श्रींची शेजारती होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)