शिर्डीत रामनवमीनिमित्त जय्यत तयारी

file photo

शिर्डी : रामनवमी उत्सवानिमित्त साईंच्या शिर्डीतील तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून साईबाबा संस्थानने रामनवमीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली आहे. 24 मार्च ते मार्च ते 26 मार्च दरम्यान तीन दिवस रामनवमी उत्सव साजरा केला जाणार आहे. रामनवमी उत्सावाच्या मुख्य दिवशी साईमंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. साईबाबा समाधी शताब्दी वर्ष असल्याने यंदाची रामनवमी भाविकांच्या दृष्टीने महापर्वणी ठरणार आहे.

शिर्डीतील रामनवमी उत्सव 1911 साली सुरु झाला. रामनवमी निमित्त साईबाबा संस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता भाविकांसाठी ठिकठिकाणी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. रामनवमी उत्सवानिमित्त मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीने भव्य प्रवेशद्वार उभारण्याचं काम सुरु आहे. याठिकाणी शिव भोला भंडारी अशा आशयाचा 50 फुटी देखावा उभारण्यात येतो आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)