शिर्डीत दागिने चोरणारी महिलांची टोळी गजाआड

शिर्डी – साईबाबा मंदिर परिसरात साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिला टोळीस साईसंस्थान सुरक्षा विभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने पकडले.
दरम्यान, श्रीरामनवमी उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर भक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता ही महिलांची टोळी शिर्डीत दाखल झाली होती. मात्र, उत्सवापूर्वी या टोळीचा पर्दाफाश करण्यात संस्थानच्या सुरक्षा विभागास यश मिळाले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, साईमंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत दर्शनासाठी येणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने तसेच पाकीटमारी करणारी टोळी साईमंदिर परिसरात कार्यरत असल्याचा संशय संस्थानच्या सुरक्षा विभागास आल्याने त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये गर्दीच्या ठिकाणी काही महिलांच्या संशयित हालचाली दिसून आल्या. त्यानुसार या महिलांच्या शोधासाठी विविध पथके तयार करण्यात आली. सुरक्षारक्षक पथकाने शोधमोहीम हाती घेतली असता त्यांनी तीन महिला शिर्डी शहरातील कानिफनाथ मंदिराजवळ, तर तीन महिला साईमंदिराच्या गेटनंबर तीनजवळ संशयितरित्या फिरताना आढळून आल्या.
संस्थान महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या महिलांना पकडून सुरक्षा विभागात आणले. सीसीटीव्हीत दिसून आलेल्या महिला त्याच असल्याचे आढळून आले. पकडलेल्या महिलांची नावे गीतादेवी राहुल (वय 25), संतोष सानू (वय 30), केला राजू (वय 35, सर्व रा. रेल्वे स्टेशन, मच्छीमोहल्ला, जयपूर), विरवती पोपासिंग (वय 65, शिकारी मोहल्ला, जयपूर), आशादेवी समंदर चव्हाण (वय 25, शिकारी मोहल्ला, जयपूर), शकुंतला विजयदर (वय 60, शिकारी मोहल्ला, जयपूर) अशी असून त्यांची चौकशी करून अधिक तपासासाठी शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे साईसंस्थान सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)