शिर्डीतून 78 आसनी विमानसेवेस उत्साहात प्रारंभ

पहिल्याच दिवशी एक हजारांपेक्षा जास्त प्रवाशांनी घेतला लाभ

शिर्डी: शिर्डीत विमानतळ सुरू झाल्याने देशातील भाविकांची तेथे गर्दी वाढली आहे. त्यामुळे आजपासून (दि.6) स्पाईस जेट कंपनीने देशातील प्रमुख शहरांसाठी 78 आसनी 4 विमानांच्या फेऱ्या सुरू केल्या आहे. त्यात वाढ होऊन त्या 20 करण्यात येणार असल्याची माहिती विमाना प्राधिकरण कंपनीचे व्यवस्थाप धिरेन भोसले यांनी दिली. यासेवेमुळे महानगरांतील भाविकांना दरम्यान मागील वर्षी सुरू झालेल्या शिर्डी विमानतळाची वाटचाल यशस्वीरीत्या सुरू असून, नवीन वर्षात भाविकांच्या सुविधेसाठी स्पाईस जेट कंपनीने आजपासून देशातील प्रमुख शहरांसाठी 78 आसनी 4 विमानांच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. पहिल्याच दिवशी 1 हजारांपेक्षा जास्त भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान 1 ऑक्‍टोबर 2017 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते विमानतळ व विमान सेवेचे उद्‌घाटन करण्यात आले होते. शिर्डी विमानसेवेची स्वप्नपूर्ती झाली असून, विमानतळ व्हावे, यासाठी 1995 सालापासून प्रयत्न सुरू होते. अनेक अडचणींवर मात करत हे विमानतळ पूर्ण झाले आहे. या विमानतळासाठी 320 कोटी रुपये खर्च झाले असून नऊ वर्षांत याचे काम पूर्ण झाले आहे. ऑक्‍टोबर 2017 पासून मुंबई-शिर्डी व हैद्राबाद-शिर्डी या दोन सेवांचा प्रारंभ झाला आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर राज्यांतूनही विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये शिर्डी ते दिल्ली स्पाईस जेट कंपनीचे 189 सीटर बोईंग विमानसेवा सुरू झाली. दरम्यान, देशातील 10 ठिकाणांवरून रविवारी विमानसेवेला सुरुवात झाली असून, 10 जानेवारी पासून चेन्नईसाठी स्पाईस जेट कंपनीचे 189 सीटर बोईंग विमानसेवा सुरु होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

आज स्पाईस जेट कंपनीने जयपूर, भोपाल, बेंगलोर, अहमदाबाद या चार शहरांसाठी 78 आसनी चार फ्लाईट सुरु केल्या आहे. दरम्यान या सेवेमुळे साई भक्तांना मोठी सुविधा निर्माण झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. या विमानतळावरून एअर इंडियाची एअर अलाएन्स ही कंपनी हैदराबादहून आणि एक मुंबईहून सेवा पुरवित आहे. स्पाईस जेट आता हैद्राबाद, दिल्ली, भोपाळ, जयपूर, बंगलोर अशा फ्लाईट चालवते. त्याबरोबरीनेच हैदराबादहून मंगळवार आणि रविवार अधिक एक एक विमान चालविले जाते. यात दिल्ली आणि चेन्नई ही विमाने बि.737 -189 आसनी असणार आहेत, तर इतर ही एटीआर म्हणजेच 78 आसनी आहेत. दरम्यान डेली 20 फ्लाईट सुरु झाल्याने भविष्यात शिर्डीच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून येणार असून, शिर्डी शहराची वाटचाल पंचतारांकित शहराकडे होणार आहे. काकडी येथील शेतकऱ्यांच्या या विमानतळावर सध्या प्रवासी वाहतूक करण्यासाठी सुमारे 80 वातानुकुलीन वाहने असून, त्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे काकडी ग्रामस्थांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)