शिर्डीतील सौरऊर्जा विद्युत प्रकल्पास तांत्रिक मंजुरी 

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे : सपत्नीक साईबाबा समाधी दर्शन; साईसंस्थानचे कौतुक
शिर्डी – शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्थेच्या प्रस्तावित 10 मे.वॅ.ए.सी. क्षमतेच्या पारेषण संलग्न सौरऊर्जा विद्युत प्रकल्पास तांत्रिक मंजुरी देण्यात आल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
मंत्री बावनकुळे यांनी गुरुवारी सपत्नीक साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्था शिर्डीकरिता प्रस्तावित 10 मे.वॅ.ए.सी. क्षमतेच्या पारेषण संलग्न सौरऊर्जा विद्युत प्रकल्पास तांत्रिक मंजुरी दिली असल्याचे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणचे पत्र संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे सुपूर्द केले.
या वेळी आ. स्नेहलता कोल्हे, मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, अधीक्षक अभियंता भुजंग खंदारे, संस्थानचे उपजिल्हाधिकारी मनोज घोडे, विद्युत विभागप्रमुख विजय रोहमारे आदी उपस्थित होते.
मंत्री बावनकुळे म्हणाले, श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्था शिर्डीकरिता प्रस्तावित 10 मे.वॅ.ए.सी. क्षमतेच्या पारेषण संलग्न सौरऊर्जा विद्युत प्रकल्प संस्थानने महाऊर्जा अभिकरणाकडे पाठविला होता. त्यास 25 एप्रिल 2018 रोजी महाऊर्जा प्रशासनाने तांत्रिक मान्यता दिली. प्रशासकीय मान्यता मिळवून तत्काळ निविदा काढणे आणि सहा महिन्यात सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न श्री साईबाबा संस्थानने केला आहे. या कामी शासन संस्थानला पूर्ण मदत करेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संस्थानचा जो विजेचा भार आहे तो पूर्ण कमी होईल.”
राज्याची विजेची बचत करून व सौरऊर्जा तयार करण्याच्या या राष्ट्रीय कार्यक्रमास श्री साईबाबा संस्थानने हातभार लावल्याबद्दल संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल व सर्व विश्‍वस्त मंडळाचे बावनकुळे यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)