शिर्डीची विमानसेवा पूर्ववत

धावपट्टीवरून घसरलेल्या विमानाची पथकाकडून पाहणी

कोपरगाव – तालुक्‍यातील काकडी येथील शिर्डी विमानतळावरील विमानसेवा मंगळवारी सायंकाळी पूर्ववत झाली. विमान प्राधिकारणाच्या वरिष्ठ पथकाने धावपट्टीवरून घसरलेल्या विमानाची पाहणी केली.

मुंबईहून शिर्डी विमानतळावर सोमवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान 55 प्रवासी घेऊन विमान आले होते. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच अचानक विमान धावपट्टीवरून घसरत 50 मीटर धावपट्टीच्या पुढे घसरत गेले. यावेळी मोठा आवाज झाला. धुरळा उडवत विमान थांबले. घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. विमान वैमानिकाच्या निष्काळजीपणामुळे घसरले की अन्य कारणामुळे हे समजू शकले नाही. या घटनेमुळे सायंकाळी 5 ते साडेपाचच्या दरम्यान हैद्राबाद व मुंबईकडे जाणाऱ्या विमानांची उड्डाणे विमान व्यवस्थापक अधिकाऱ्यांनी रद्द केली होती.

या घटनेमुळे विमान प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी (दि.22) मे रोजी सकाळी अपघातग्रस्त विमानाची पाहणी करून प्रथमदर्शनी विमान चालकाची चुक असल्याचे सांगितले. अधिक तांत्रिक बिघाड झाला काय? याचा शोध घेण्याचे काम सुरू होते. सोमवारी दिवसभर षिर्डी विमानतळावरील विमान सेवा ठप्प होती. घसरलेले विमान योग्य ठिकाणी उभे करून विमान प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांनी विमान सेवा पूर्ववत केली.
अपघातग्रस्त विमानामध्ये प्रवास केलेल्या प्रवाशांना शिर्डी येथील विविध हॉटेलांमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था आली. हैद्राबाद व मुंबईला विमानाने जाणाऱ्या प्रवाशांची पुणे विमानतळावरून जाण्याची व्यवस्था केल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)