शिर्डीकरांचा साईबाबा संस्थानविरोधात निषेध मोर्चा

शिर्डी – विदर्भातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी साईबाबा संस्थानच्या तिजोरीतून 71 कोटी रुपये साईबाबा विश्वस्त व्यवस्थेने देण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त झालेल्या शिर्डी येथील नागरिकांनी शनिवारी( दि.29) सकाळी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या विरोधात हनुमान मंदिरापासून ते साईबाबा रुग्णालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.
या आंदोलनात शिर्डीतील महिला पुरुष वर्गांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. यावेळी या आंदोलनात प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, विजय कोते, नितीन कोते, उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, महेंद्र शेळके, सुधाकर शिंदे, भानुदास गोंदकर, बाबासाहेब कोते, अशोक कोते, जगन्नाथ गोंदकर, अशोक गोंदकर, मंगेश त्रिभुवन, हरिश्‍चंद्र कोते, ताराचंद कोते,जमादार इनामदार,माजी उपनगराध्यक्षा अलकाताई शेजवळ, पोपट शिंदे, सुनील सदाफळ,गाफ्फार्खन पठाण, उत्तम कोते, डॉ.सुयोग गोंदकर, गोपीनाथ गोंदकर, नितीन शेळके, राजेंद्र कोते, राकेश शिंदे, गणेश गोंदकर, अप्पासाहेब कोते, प्रमोद नागरे, अरुण चौधरी, दीपक वारुळे, देवराम सजन, सचिन गायकवाड ,राकेश भोकरे, सोमराज कावळे आदीसह आजीमाजी नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी शिर्डी नागरिकांनी संताप व्यक्त करत साईबाबा संस्थानच्या कारभाराचा फलकाद्वारे निषेद व्यक्त करत साईबाबा रुग्णालयात रुग्णासाठी सुखसुविधा द्यावी अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी करीत शहरातून मोर्चा काढला. यावेळी साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हावरे आणि त्यांचे विश्वस्थ मंडळाला उपचार मिळाले नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगत हावरे यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून शिर्डी अमरधाम मध्ये नेण्यात आली. यावेळी अंतयात्रेला खांदा देण्यासाठी तृतीय पंथीयांना बोलाविण्यात आले होते.
स्मशान भूमीत अंत्यविधी करण्यात येऊन शोकसभा घेऊन हावरे यांच्या कारभाराचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान साईबाबांच्या झोळीत कोट्यवधींचं दान येत आहे. या दानाचा राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांना संस्थानच्या साईबाबा रुग्णालयात अद्यावत सुखसुविधा निर्माण करण्यासाठी उपयोग होत नसल्याने शनिवारी सकाळी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे आणि विश्वस्त मंडळाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. साईबाबा विश्वस्त व्यवस्तेने यवतमाळ, नागपू, चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाला तसेच औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाला एकूण मिळून 71 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
संस्थानच्या पैशांचा गरीबांच्या कल्याणासाठी वापर होणं गरजेचं असतांना मात्र त्याची खिरापत विदर्भातील वैद्यकीय महाविद्यालयांना निधी म्हणून वाटली जात असल्याचा आरोप शिर्डी ग्रामस्थांनी केला आहे. शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे साईबाबा रुग्णालयात रुग्णांसाठी पुरेशा सुविधा नाहीत. वैद्यकीय महाविद्यालयांसाठी दिलेला मदतनिधी येथील रुग्णालयात नवी यंत्र सामुग्री , रुग्णवाहिका तसेच रुग्णांसाठी इतर सुख-सुविधा देण्यासाठी वापरण्यात आला असता तर आम्ही त्याचे स्वागत केलं असतं असं मत आंदोलन कर्त्यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)