शिरोली सुलतानपुर ते निमगाव सावा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

बेल्हे-शिरोली सुलतानपुर ते निमगाव सावा या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी करूनही प्रत्यक्ष कामाला मुहूर्त केव्हा सापडणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिरोली सुलतानपूर ते निमगावसावा हा रस्ता एका बाजुने पुणे-नाशिक महामार्ग तर दुसऱ्या बाजुने बोरी बुद्रुकमार्गे नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गाला जोडलेला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी येथे टोल नाका असल्याने नगरहुन येणारी वाहने टोल वाचवण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची गर्दी आहे. वाहन चालकांना या रस्त्यावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा वाहन या रस्त्यावरील खड्ड्यांत जाऊन अपघात झाले आहेत. त्यातच या रस्त्यावर सुमारे दोन वर्षांपासून नुसती खडी टाकून ठेवली. यावर डांबर न टाकल्याने वाहन चालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. गेल्या पाच दिवसांत या रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात होऊन कित्येकजण गंभीर जखमी झाले आहेत. या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव, राजेंद्र भोर हे गेल्या अडीच वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत; मात्र या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला प्रत्यक्ष सुरवात झालेली नाही.
दरम्यान या रस्त्याची दुरूस्ती तातडीने सुरू केली नाही, तर या रस्त्यावरील खड्ड्यांत वृक्षारोपण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)