शिरोली तर्फे आळे शाळेला मिळणार स्वच्छतागृह

नारायणगाव-रोटरी क्‍लब फिनसॅंड स्वीडन, पुणे हिलसाईड व रोटरी क्‍लब नारायणगाव हायवे यांच्या संयुक्‍त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा शिरोली तर्फे आळे शाळेसाठी शौचालय बांधकामासाठी 2 लाख रुपये देण्यात आल्याची माहिती रोटरी क्‍लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष महेश बोराणा व बाळासाहेब गिलबिले यांनी दिली. रोटरी क्‍लबच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांतर्गत रोटरी पुणे हिल साईडचे माजी अध्यक्ष डॉ. मिना बोराटे यांनी विशेष प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला आहे. या बांधकामाचे भूमिपूजन गुरूवारी (दि. 22) करण्यात आले. या प्रसंगी सरपंच जयसिंग गुंजाळ म्हणाले की, निधी कमी पडल्यास लोकसहभाग घेऊन दर्जेदार काम करु. यावेळी प्रा. पंजाब कथे, ऍड. भालेराव, तंटामुक्‍ती अध्यक्ष अविनाश डावखर, रामभाऊ सातपुते, गोपीनाथ गुंजाळ, हभप तुकाराम डावखर, ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू पोळ, दगडू डावखर, निवृत्ती डावखर, अर्जुन खिलारी, शितल भोर, सुषमा गाडेकर, मिनाक्षी जाधव, रोहिणी गिलबिले, विष्णू धोंडगे उपस्थित होते. प्रास्ताविक रवींद्र वाजगे तर सूत्रसंचालन राजू जाधव आणि बाळासाहेब गिलबिले यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)