शिरोलीच्या विद्यार्थ्यांची विधानसभा सफर

नारायणगाव- शिरोली (ता. जुन्नर) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी मुंबईतील विधानभवन येथे विधानसभेचे कामकाज कसे चालते, नक्की विधानसभा म्हणजे काय असते, हे पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी बुधवारी (दि 28) मुंबईला गेले होते. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून विधानसभेतील कामकाजाबाबत ही अभ्यासपूर्ण सफर विद्यार्थ्यांसाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये विधानसभेबाबत माहिती घेताना उत्साह आणि कुतूहल होते. आमदार सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)