शिरूर-हवेली मतदारसंघातून भाजपच्या वर्धापन दिनी हजारो कार्यकर्ते जाणार…

वाघोली- भाजपच्या 6 एप्रिल रोजी मुंबई येथे होणाऱ्या वर्धापन दिनाच्या पाश्वभूमीवर शिरूर-हवेली तालुक्‍यातून हजारो कार्यकर्ते जाणार असून, त्यासाठी आज (दि. 24) हवेली तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकी झाली. यावेळी हवेली तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रोहिदास उंद्रे, पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष दादासाहेब सातव, उपाध्यक्ष गणेश कुटे, चिटणीस प्रवीण काळभोर, पुणे जिल्हा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे युवा नेते अजिंक्‍य कांचन, महिला मोर्चाच्या सरचिटणीस पुनम चौधरी, महिला मोर्चाच्या अध्यक्षा राजश्री काळभोर, भारतीय जनता पक्ष अनुसूचित जमाती महिला मोर्चाच्या अध्यक्षा सारिका लोणारी, हवेली तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रामदास हरगुडे, भारतीय जनता पक्षाचे हवेली उपाध्यक्ष समीर भाडळे, सरचिटणीस गणेश चौधरी, पेठ महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे चिटणीस विजय हरगुडे, पुणे जिल्हा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्‍याम गावडे, पुणे जिल्हा भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप यांसह भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)