शिरूर येथे राष्ट्रीय “वयोश्री’ शिबिर

उपमुख्य कार्यकारी अधिकारी घुले यांची माहिती : 21 व 22 डिसेंबर रोजी आयोजन

राजगुरूनगर- शिरूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय “वयोश्री’ योजना शिबिरात जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्‍तींनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी राजगुरुनगर येथे झालेल्या आढावा बैठकीत केले.
शिरुर येथे शुक्रवारी (दि. 21) व शनिवारी (दि. 22) दोन दिवसीय राष्ट्रीय वयोश्री योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राजगुरुनगर येथे पंचायत समितीच्या सभागृहात “राष्ट्रीय वयोश्री योजने’त जास्तीत ज्येष्ठ नागरीकांना सहभागी होण्यासाठी जिल्हा परीषदेच्या विविध विभागातील वरीष्ठ अधिका-यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी नियोजन आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी दिपक चाटे, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार-डावरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश गोरे, सहाय्यक गटविकास अधिकारी नारायण मिसाळ, तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी एस. डी. दुधाळकर, डी. डी. कुलकर्णी यांच्यासह तालुक्‍यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आशा सुपरवायझर उपस्थित होते.
या नियोजन बैठकीत गावपातळीवरील पिवळे रेशनिंग कार्ड, तसेच तलाठी किंवा तहसीलदार यांचा 21 हजाराचे आत उत्पन्न दाखला असणारे सर्व साठ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगासाठी हे शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या रुग्णांना व्हील चेअर्स, श्रवणयंत्रे, चष्मा, वॉंकर, ट्राय पॉंड, वॉंकींग स्टीक, क्वाड पॉंड, दंतचिकित्सा व दातांची कवळी उपचार करुन साहित्य दिले जाणार आहे. सहभागी होणाऱ्यांसाठी ग्रामपंचायतीमार्फत येण्या-जाण्यासाठी सर्वांसाठी आवश्‍यक वहाने उपलब्ध करुन सोय करण्यात यावी, असे आदेश घुले यांनी दिले आहेत.

  • पात्र रुग्णांचे सर्व्हेक्षण करा
    आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी तसेच अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांनी समन्वय ठेऊन गावपातळीवरील ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेऊन या योजनेतील पात्र रुग्णांचा सर्व्हेक्षण करुन त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज भरुन तालुका पातळीवर जमा करावेत, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने आणि जिल्हा महिला व बाल प्रकल्प अधिकारी दीपक चाटे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)