शिरूर पांजरपोळमध्ये वसुबारस उत्साहात

शिरूर- वसुबारसनिमित्त शिरूर येथील गोरक्षनाथ पांजरपोळ संस्थेत जैन बांधवांच्या वतीने गाय व वासरू (गोमातेची)) पूजा करून तिला गोडधोड खाऊ घालून दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वसुबारसनिमित्त व दिवाळीच्या पहिल्या दिवसानिमित्त पांजरपोळ संस्था शिरूर येथे जैन बांधव च्या उपस्थितीत वसुबारस साजरी करण्यात आली. जैन गुरू रिद्धी महाराज साहेब यांच्या वतीने गोमाती की पूजा करून त्यांना लापशी जाणे नैवैद्य देण्यात आला. आला तर जैन सुवासिनींच्या वतीने गोमातेस कुंकू वाहून आरती ओवाळण्यात आली. यावेळी पूजा करण्यात आली. यावेळी जैन बांधव महिला, पुरुष व मुलेही उपस्थित होते.
शहरातील गोरक्षण पांजरपोळ येथील गायीच्या गोठ्यावर जाऊन यावेळी गायीचे पूजन करून भुसा, गूळ गायींना भरविण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी बाल गोपाळांसह अनेकांनी गायीचे पूजन केले. जैन धर्मगुरू रिद्धीजी, सिध्दीजी, अनिल बोरा, देवल शहा, राहुल बोथरा, सुरेंद्र कर्नावट, डॉ. दिनेश शहा, लोकेश चोपडा, कामिनी बाफना, रुपाली बोरा, संतोष पटवा, अमित शहा, गणेश कोठारी, अमित गांधी, सचिन लोढा, सागर नरवडे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)