शिरूर तालुक्‍यात कायदा सुव्यवस्था ढासळली

शिरुर – तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबार, कोरेगाव भीमाची दंगल, सातत्याने घडलेल्या खुनांच्या घटनांनी शिरुर तालुक्‍यात कयदा सुव्यस्थेचा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

शिरुर तालुक्‍यात नवीन वर्षाची सुरुवात झाली.. ती कोरेगाव भीमा दंगलीने. कोरेगाव भीमा येथे दंगल झाल्याने गेल्या काही दिवसांपासून शिरुर तालुका अशांत झाला. त्यानंतर सनसवाडी येथे भरदिवसा गोळीबार प्रकरण होऊन त्यात एकाला जीव गमवावा लागला. पुढील काही दिवसांत शिरसगाव काटा येथे दुहेरी खून प्रकरण घडले. यात दोघा वृद्धांचा खून करण्यात आला. दरम्यानच्या काळात रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत वाघाळे, खंडाळे या भागात खुनाच्या घटना घडल्या. त्याचप्रमाणे मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शिरुर शहरात बसस्थानकासमोर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करुन एकाची हत्या करण्यात आली. तर नगगरसेवकावरही हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. हा सर्व प्रकार गर्दीच्या, रहदारीच्या ठिकाणी भरदुपारी नागरिकांनी पाहिला. तर नगरपालिका कर्मचारी यांच्यावर झालेला हल्ला, कोरेगाव भीमाजवळ झालेला कंपनी अधिकारी यांच्यावर हल्ला यात त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे तालुक्‍यात तरुण भरकटत चालले दिसून येत आहेत.

शिरुर तालुक्‍यात गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या गंभीर खुनांच्या घटनांनी तालुक्‍यात कायदा सुव्यवस्थेचे एकप्रकारे धिंडवडे निघत आहेत. शिरुर तालुक्‍यात अशांतता माजविण्यांवर काय कारवाई पोलीस करतात, असा सवाल नागरिक करु लागले आहेत. शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत सणसवाडी गोळीबार प्रकरणाचं काय झालं? असा सवाल त्या भागातील नागरिक करत आहेत. शिरसगाव काटा येथे दुहेरी खून प्रकरण होऊनही यातील आरोपींना अटक करण्यात आली नाही. शिरुर शहरात धूमस्टाईल चोरट्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल सहा चोऱ्या त्याही भर गर्दीत केल्या. रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीतही अधूनमधून गुन्हेगारी डोके वर काढत असते. तर सर्वच भागात मोठ्याप्रमाणात अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. यातून ही मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. याकडे मात्र तिन्ही पोलीस खात्याचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. तर पोलीस अधीक्षक सुवेज हक यांचा म्हणावा असा दबदबा अवैध धंद्यावर नसल्याचे आढळत आहे. एकीकडे मटका बंद असल्याचे बोलले जाते, परंतु या तिन्ही पोलीस स्टेशन आवरत खुलेआम सुरू आहे. हे हक साहेबांनी लक्षात घ्यायला हवे, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्‍त होत आहे. या वाढत्या गुन्हेगारीला लवकरात लवकर आळा घालण्याची गरज आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पावले टाकली पाहिजेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)