शिरूर तालुक्‍यातील 559 शिक्षकांच्या बदल्या

गटशिक्षण अधिकारी कळमकर : 82 झाले विस्थापित
शिरूर – शिरूर तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील 559 शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये 8 मुख्याध्यापक, 65 पदवीधर शिक्षक, 486 उपशिक्षक यांच्या बदल्या झाल्याचे शिरूर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी सांगितले.

शिरूर तालुक्‍यात 897 बदलीपात्र शिक्षकांपैकी 559 बदली आदेश दिले आहेत तसेच विस्थापित झालेल्या 82 ,शिक्षकांमध्ये 80 उपशिक्षक व दोन पदवीधर शिक्षक यांचा समावेश आहे. या 82 शिक्षकांना पुन्हा एकदा ऑनलाईन फॉर्म भरून 20 शाळांची मागणी करावी लागणार आहे, असे कळमकर यांनी सांगितले.

झालेल्या बदल्या या समाधानकारक असल्याचे अनेक शिक्षकांनी सांगितले; परंतु विस्थापित झालेल्या शिक्षकांना सुद्धा तालुक्‍यातच नियुक्ती मिळावी अशी मागणी शिक्षक नेते शिवाजी वाळके यांनी केली आहे. तसेच विस्थापित झालेल्या शिक्षकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय असल्याने त्यांची नियुक्ती (NIC) ने तालुक्‍यात करण्याची मागणी शिक्षक नेते माऊली पुंडे, अनिल पलांडे, बापू लांडगे, शहाजी पवार, बाळासाहेब आसवले यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)