टाकळी हाजी-शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब आसवले यांची तर, उपाध्यक्षपदी संध्या धुमाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शिरूर तालुक्‍यातील सर्व शिक्षकांचे हिताचे निर्णय आणि पारदर्शक कारभार करणार असल्याचे आसवले यांनी सांगितले. संस्थेच्या वतीने पदवीधर संघटनेचे अध्यक्ष शहाजी पवार यांनी त्यांचा सत्कार केला. त्यावेळी माजी सभापती कल्याण कोकाटे, संचालक अनिल पलांडे, शिवाजी वाळके, बाळासाहेब खामकर, नाथू वीर आणि संचालक मंडळ उपस्थित होते. नूतन अध्यक्ष आसवले यांचे शिक्षक समितीचे अध्यक्ष शरद निंबाळकर, संभाजी फराटे, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश चव्हाण, सतीश नागवडे शरद धोत्रे, ज्ञानेश्वर नरवडे, सखाराम फराटे, बापूराव नरवडे, मानसिंग वाकडे, प्रकाश नरवडे या शिक्षक समितीच्या नेत्यांनी आभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)