शिरूरला परतीच्या पावसाची दमदार हजेरी

टपाल कार्यालयावर झाड कोसळले : फांद्या तुटल्या, मात्र, कुठेही जीवितहानी नाही

शिरूर– शिरूर शहर आणि पंचक्रोशीमध्ये सोमवारी (दि.1) वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे टपाल कार्यालयाच्या छतावर झाड कोसळून पत्रा फाटला. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतूक खोळंबली. मात्र, कुठलेही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
संपूर्ण पावसाळ्यात शिरूर शहरात पावसाने ओढ दिली होती. परंतु परतीच्या पावसाने सोमवारी (दि.1) दमदार हजेरी लावली. या पावसाळ्यातील सर्वात मोठा पाऊस म्हणून या पावसाकडे नागरिकांनी पाहिले. याचा आनंद लुटला. तर पुढील हंगाम असेच दोन तीन चांगले परतीचे पाऊस झाले तर हंगाम चांगला जाईल, अशी आशा आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. या पावसाने बळीराजाच्या चेहऱ्यावर आणले.
शिरूर शहरात पावसाळा सुरू झाल्यापासून वरूणराजा नाराज झाला होता. या भागामध्ये अजिबात पाऊस पडला नव्हता. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील मूग, बाजरी आणि इतर कडधान्याची पिके वाया गेली होती. यापुढील काळामध्ये ज्वारी आणि गावाचे ही पीक येणार नसल्याची भीती शेतकऱ्यांत होती. गेल्या आठवडाभर वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा पसरला होता. यामुळे नागरिक हैराण झाले होते. परंतु या उकाड्यामुळे पाऊस येण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली होती. परंतु गेल्या साडेतीन महिन्यात वरूणराजाने नागरिकांना फसवले होते. गेली साडेतीन महिने केवळ फवारा मारावा, असा पाऊस या परिसरात पडला होता. जनावरांना चारा खायलाही उगवला नव्हता. या सर्वांमुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट पसरले होते. मूग, बाजरी आणि इतर कडधान्य आणि धोका दिला होता. त्यामुळे नगदी पैसा मिळायला पाहिजे होता, तो या पावसाळ्यात शेतकऱ्याकडे आला नाही. यामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट पसरले होते. शेतकऱ्याबरोबर सर्वसामान्य नागरिक व्यापारीही चिंतेत होता.
सोमवारी (दि.1) सकाळीपासूनच वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. पाऊस पडेल असे सकाळीच वाटत होते. परंतु दुपारपर्यंत पावसाने दडी मारली होती आणि आजही पाऊस पडेल असे वाटले नव्हते. परंतु आज दुपारच्या दरम्यान अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला. विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला. काही वेळात त्याने रस्त्यावर पाणीच पाणी केले. गाडीतळ, टपाल कार्यालय, रेव्हेन्यू कॉलनी आणि इतर ठिकाणी झाडांची फांद्या कोसळल्या. तर स्टेट बॅंक कॉलनीत रस्त्यांवर लिंबाचे झाड कोसळले. तसेच चासकमान कॉलनी येथे ही झाडाची पडझड झाली.पाऊस आल्यानंतर अडीच तास वीजपुरवठा खंडीत केला होता. या परतीच्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)