शिरूरमध्ये शेतकऱ्यांचे एक दिवसीय धरणे

पेंशनसाठी आक्रमक : प्रभारी तहसीलदारांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

शिरूर- राज्यातील 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना दरमहा किमान 5 हजार रुपये पेंशन मिळावी यासह विविध मागण्यांसाठी जनता दल (सेक्‍युलर) यांच्यावतीने शिरुर तहसील कार्यालयाच्या आवारात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रभारी तहसीलदार संजय जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जनता दल सेक्‍युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, महिला जिल्हाध्यक्ष माया जाधव, शिरूर तालुका अध्यक्ष विष्णुपंत दसगुडे, शहराध्यक्ष हाफीज खान, बारामती तालुका अध्यक्ष डॉ. अमर मोरे, रवींद्र धनक, बापू सानप, महमदहुसेन पटेल, बाळासाहेब घाडगे, दत्ता ढेरंगे, सयाजी नवले व कार्यकते उपस्थित होते.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शेतकऱ्यांना पेंशन मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. सरकारकडे भिक मागत नाही. संविधानाने दिलेल्या जगण्याच्या हक्कामुळे सर्वच भारतीय सन्मानाने जगविण्याची कायदेशीर जबाबदारी सरकारची आहे.त्यामुळे पेंशन हा शेतकऱ्यांचा संविधानिक हक्क आहे. केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पश्‍चिम बंगाल, गोवा, सिक्कीम, उत्तराखंड राज्यांमध्ये पेंशन मिळत आहे. ओरिसामध्ये मिल्क फेडरेशन मार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना पेंशन मिळत आहे.तर मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाणा सरकारनेही शेतकऱ्यांना पेंशन देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना पेंशन का देत नाही असा सवाल करत विधिमंडळात अनेक आमदारांनी शेतकरी पेंशनचा आग्रह धरणारे प्रश्‍न उपस्थित केले असून विधानपरिषद सदस्य रामहरी रुपनावर यांनी खासगी विधेयकही मांडले आहे. त्यावर चर्चा करुन जनता दलाने आजपासून सरकारला धक्का देण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू केले असल्याचे नमूद केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)