शिरूरमध्ये शिवदीपोत्सवाने परिसर उजाळला

शिरूर- शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीचे तरुण तसेच विविध महिला सामाजिक संघटनांच्या महिलांनी येथील शिवस्मारकाजवळ शिवदीपोत्सव साजरा केला. यावेळी रांगोळीच्या माध्यमातून सुंदररित्या रेखाटण्यात आलेली जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती दीपोत्सवात उजळून निघाली. दीपावलीनिमित्त तरूणांचे मन शिवरायांच्या विचारानेही उजळून निघावेत. या भावनेने उत्सव समितीने शिवस्मारकाजवळ दीपोत्सव साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यंदाचे सहावे वर्ष आहे. नगराध्यक्षा वैशाली वाखारे, पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या हस्ते दीपोत्सवाची सुरूवात करण्यात आली. दीपोत्सवाच्या ठिकाणी सुवर्णा सोनवणे, सपना कर्नावट व ऐश्वर्या लंघे यांनी रांगोळीच्या माध्यमातून जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती साकारली. त्याभोवती दीप प्रज्वलित केल्याने प्रतिकृती उजळून निघाली. यावेळी नगरसेविका रोहिणी बनकर, मनीषा कालेवार, दक्षता समितीच्या अध्यक्षा शोभना पाचंगे, उपनिरीक्षक किरण घोंगडे, आदिशक्ती महिला मंडळाच्या संस्थापिका शशिकला काळे, अध्यक्षा सुनंदा लंघे, ऍक्‍टीव्ह ग्रुपच्या अध्यक्षा कामिनी बाफणा, वारसा जिजाऊ फाऊंडेशनच्या अध्यक्षा मंजुश्री थोरात, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा पल्लवी शहा, ऍड. सीमा काशीकर, रूपाली ढमढेरे, नंदा खैरे, जयश्री थेऊरकर, युवा स्पंदनच्या प्रियांका धोत्रे, आदिशक्‍तीच्या सचिव लता नाझिरकर, वारसा फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शिल्पा बढे, वर्षा नारखडे, अलका ढाकणे, उपक्रमाचे आयोजक कुणाल काळे, योगेश जामदार, सचिन जाधव, आलोक वारे, योगेश फाळके, अक्षय ढमढेरे, प्रशांत टकले, अभिषेक शितोळे तरुण व महिला उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)