शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा कॅंडलमार्च

शिरूर-पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना शिरूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कॅंडल मार्च काढण्यात आला. तर शिरूर हुतात्मा स्मारकाजवळ पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
कॅंडल मार्च छत्रपती शिवाजी महाराज पुतळास पुष्पहार घालून बाजार समितीचा आवारातून सुरु झाला. संपूर्ण शिरूर शहरातून फेरी मारल्या नंतर शिरूर येथील हुतात्मा स्मारका जवळ मेणबत्त्या पेटवून शहीद जवान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यात पुणे जिल्हा परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धन समितीचा सभापती सुजाता अशोक पवार, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, रावसाहेब पवार घोडगंगा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे, मेजर दशरथ गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, राजेंद्र जगदाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे, शहराध्यक्ष नगरसेवक मुझफ्फर कुरेशी, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, अध्यक्षा पल्लवी शहा, बाबासाहेब सासवडे, मोनिका हरगुडे, मुस्लिम समाज अध्यक्ष इकबाल सौदागर, उपाध्यक्ष नसीम खान, ऍड. शिरीष लोळगे, ऍड. रवींद्र खांडरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र जाधवराव, रंजन झांबरे, मनीषा कालेवार, कामिनी बाफना, अपर्णा शहा, रवींद्र खांडरे, हाफीज बागवान यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका सहभागी झाले होते. शहरातील मुख्य रस्त्यावरुन हा मार्च गेला. हुतात्मा स्मारक येथे मार्चची समाप्ती झाली. येथे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला.
यावेळी बोलताना माजी आमदार ऍड. अशोक पवार म्हणाले, पुलवामा येथे शहीद जवानांच्या मागे संपूर्ण देश उभा असून, या हल्ल्याचा निषेध करून याचा बदला घ्यावा. माजी मेजर दशरथ गायकवाड म्हणाले, पुलवामा हल्ल्याचे उत्तर देण्यासाठी भारतीय जवान तयार असून, केवळ दहशतवादी नाहीतर त्यांना पोसणारे पाकिस्तान राष्ट्र संपवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. पुलवामामधील शहीद जवान यांच्या बदला लवकरात लवकर घ्यावा त्यासाठी वेळ आली तर आम्ही रिटायर्ड जवान पुन्हा सीमेवर जाण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)