शिरूरमध्ये महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक

शिरूर – भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शिरूर शहरातून त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.
येथील जैन मंदिरापासून मिरवणुकीस सुरूवात झाली. कापड बाजार, राम आळी, सरदार पेठ, हलवाई चौक, मुंबई बाजार या परिसरातून ही मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. जैन स्थानकाजवळ मिरवणूक पोहचल्यावर संघपती शांतीलाल कोठारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. किर्तीसुधाजी महाराज, तिलकदर्शनाजी महाराज यांचे प्रवचन यावेळी झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)