शिरूरमध्ये भरदिवसा चोऱ्या

शिरूर-शिरूर शहरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी दोन ठिकाणी चोऱ्या करून सुमारे 2 लाख 61 हजार 800 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी सुवर्णा अनिल माळवे व बहादुर रमजान पठाण यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुवर्णा अनिल माळवे या कुटुंबासह शिरूर एसटी कॉलनी वसाहत या ठिकाणी राहत असून शिरूर एसटी डेपो या ठिकाणी नोकरीस आहेत. शनिवारी (दि. 30) पती अनिल माळवे हे कामाला गेल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास कुटुंबातील सदस्यांसह घराला बाहेर कुलूप लावून बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या राजेंद्र साठे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला गेल्या होत्या. तेथील कार्यक्रम संपवून घरी आले असता घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी घरात जाउन पाहिले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. या चोरीत 50 हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिन्याचे गंठण, 30 हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण, 20 हजार रुपये किंमतीचे दोन कानातील कर्णफुले जोड, 1 हजार रुपये किंमतीचे लहान बाळाच्या कानातील एक जोड बाळी व 1 ग्रॅम सोन्याचे दागिने, 300 रुपये किंमतीचे लहान बाळाच्या पायातील चांदीच्या दागिन्यांचे पैंजण जोड, रोख रक्कम दहा हजार असे मिळून सुमारे 1 लाख 11 हजार 300 रुपये किंमतीचा ऐवज चोरी गेला असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दुसऱ्या एका चोरीत बहादूर रमजान पठाण (रा. बुरुडआळी) यांनी फिर्याद दिली असून, बहादूर यांच्या वडीलांना किडनीच्या उपचाराकामी त्यांनी मालक संजय झंझाड यांच्याकडुन 1 लाख 50 हजार रुपये जमा करून घरातील कपाटात ठेवले होते. शनिवारी (दि. 30) बहादूर हे मुलगा नूर याच्या डोळ्याला जखम झाल्याने त्याच्या उपचारासाठी घराला कुलूप लावून पत्नीसह दवाखान्यात गेले होते. दुपारी दवाखान्यातुन माघारी आल्यानंतर फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी घरात जाऊन पाहिले असता घरातील इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. फिर्यादी यांनी कपाटात पाहिले असता घरातील दिड लाख रुपये नसल्याचे दिसले. या चोरीत चोरट्यांनी 1 लाख 50 हजार रुपये, एक जर्मलचे पातेले व पासबुक असे मिळून 1 लाख 50 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी शिरूर पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले असुन पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)