शिरूरमध्ये भरदिवसा एकाचा भोकसून खून

शिरूर-शिरूर बस स्थानकासमोर उसने घेतलेले पैसे देत नसल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाने धारदार शस्राने एकाला भोकसून खून करण्यात आला. तर हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या नगरसेवकावरही आरोपीने वार करून जखमी केले. यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला व खुनाची कबुली दिली. शिरूर शहरात भरदिवसा आज (गुयुवारी) दुपारी पावणेएकच्या बसस्थानकासमोर हा प्रकार घडल्याने शहरात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याची चर्चा आहे.
प्रशांत उर्फ सांबा लक्ष्मण माळवे (वय 45, रा. हुडको कॉलनी शिरूर)असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. स्वच्छता आरोग्य समिती सभापती तथा नगरसेवक सचिन गुलाब धाडीवाल हे यात जखमी झाले आहेत. अमर रघुवीर भैसे (वय 40, रा. पाबळ फाटा, शिरूर) असे आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या महेंद्र मल्लाव यांच्या खुनाची आठवण या घटनेनंतर झाली. यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.
याबाबत शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेली माहिती व नगरसेवक सचिन धाडीवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धाडीवाल यांचे किराणा मालाचे दुकान असून, खून झालेला प्रशांत याचा भाऊ नगरसेवक सचिन धाडीवाल यांच्याकडे कामाला होता. त्यावरून त्याची व प्रशांत याची ओळख होती तर आरोपी अमर व मयत प्रशांत हे दोघे मित्र होते. अमर याला प्रशांत माळवे याने तीन महिन्यापूर्वी दहा हजार रुपये उसणे दिले होते; परंतु तीन महिने होऊन सुद्धा अमर पैसे देत नसल्याने आज दुपारी पावणेएकच्या सुमारास प्रशांत याने सचिन धाडीवाल यांना मोबाईलकरून सांगितले की, “अमर आणि मी डबेनाला येथे थांबलो असून तो उसणे घेतलेले पैसे देत नाही. तुम्ही त्याला समजून सांगायला या.’ यावेळी सचिन धाडीवाल हे नगरपालिका कार्यालयाखाली उभे होते. त्यांनी प्रशांत याला “मी लगेच येतो,’ असे सांगून त्यांच्या मोटरसायकलवर निघाले असता बसस्थानकासमोर अमर भैसे व प्रशांत माळवे यांच्यात बाचाबाची सुरू होती. प्रशांत रागात अमर याला “माझे पैसे माघारी दे,’ अशी मागणी करीत असताना सचिन धाडीवाल तेथे गेले. त्याच वेळी अमर भैसे याने त्याचा जवळील चाकू काढून प्रशांत माळवे यांच्या पोटात भोकसायला सुरुवात केली. सचिन धाडीवाल यांनी “त्याला कशाला मारतो’ असे सांगून अडविण्याचा प्रयत्न केला असता अमर याने धाडीवाल यांच्यावरही वार केले. प्रशांत माळवे जखमी झाल्याने खाली पडला. यावेळी गर्दी झाल्याने अमर हा तेथून पळून गेला.
आरोपी अमर रघुवीर भैसे यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, आर्म एक्‍ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत शिरूर चे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे, पोलिस उपनिरीक्षक धोगडे करीत आहेत.

  • चाकूने सपासप वार
    हल्ल्यानंतर नागरिकांनी जखमी प्रशांत याला धारीवाल हॉस्पिटल येथे दाखल केले असता त्याच्या पोटात, हृदयाजवळ आरोपी अमरने सपासप तेरा वार केलेले आढळले. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नगरसेवक सचिन धाडीवाल यांना सोमा करडे याने खासगी हॉस्पिटल येथे दाखल केले त्यांच्या हातावर, पोटावर, पाठीत सहा वार होऊन जखमी झाले. त्यांची प्रकृती ठीक आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)