शिरूरमध्ये आज आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

टाकळी हाजी- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा शिरूर यांच्या वतीने शिरूर तालुक्‍यातील शिक्षक बांधवाच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष सतीश नागवडे यांनी दिली. हा पुरस्कार सोहळा आचार्य भवन शिरूर येथे शनिवारी (दि. 27) होणार आहे. या पुरस्कारांचे वितरण अध्यक्ष उदय शिंदे, नाना जोशी, काळुजी बोरसे आणि विजय कोंब यांचे हस्ते होणार आहे.
शिक्षक समितीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी विविध पुरस्कार देण्यात येत आहे, असे शरद निंबाळकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सखाराम फराटे, संपत कांदळकर, लहू चव्हाण, प्रकाश पोटे, प्रकाश नरवडे, चेअरमन बाळासाहेब आसवले आणि शिक्षक समिती शिरूरच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

पुरस्कार जाहीर झालेल्यांचे नावे पुढीलप्रमाणे :
किसन टुंदा आंबवणे (आपटी), कल्याणी दत्तात्रय जवळकर (करंदी), सुखदेव पोपट सातकर (निमगाव म्हाळुंगी), सीमा विजय कुंभार (टाकळी भीमा), कल्पना विठ्ठल जगताप (तळेगाव), आप्पासाहेब फक्कड गेंद (बुरुंजवाडी), किरण राजाराम खैरे (पऱ्हाडमळा), पाटीलबुवा गुलाब डफळ (पिंपळवाडी), सुरेश बबन खैरे (खैरेनगर), निता दत्तू वाबळे (रामलिंग), बालाजी धोंडीबा पोलकमवाड, कावळे विहीर, कविता किसन देशमुख (टेमघर पुनर्वसन), दत्तात्रय दगडू गडदरे (ढोकसांगवी), नंदा संदीपान (खंडागळे), न.पा.शाळा, राजश्री अरुणकुमार मोटे (सविंदणे), दत्तात्रय गंगाधर जगताप (लाखेवाडी), जनाजी पाटील बुवा भाईक (होनेवाडी), बिभिषण ज्ञानेश्वर गांजे (दाभाडे मळा), शामराव येदुजी जगताप (शेलारमळा), ज्ञानेश्वर कृष्णा कुंभार (चिंचणी), संगिता सुरेश लवांडे (न्हावरे), मीनाक्षी नाना रसाळ (निमोणे), आप्पासो लक्ष्मण संकपाळ (मांडवगण), रविराज जनार्दन ठोंबरे (तुकाईमाळ), अजित बाजीराव रणसिंग (म्हसोबावाडी), सविता दादा दणाणे (दर्यापट), केंद्रप्रमुख पुरस्कार -महादेव दत्तात्रय बाजारे (जांबूत), रामदास सखाराम बोरुडे (मलठण), रमेश एकनाथ शेलार (वडगाव रासाई), सुनील विठ्ठल घुमरे (तांदळी),
आदर्श कार्यकर्ता पुरस्कार-बाळासाहेब धोंडीबा आसवले (चेअरमन शिक्षक सोसायटी), बाबासाहेब नारायण पवार, आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रवीण सिताराम गायकवाड यांना तर आदर्श शाळा पुरस्कार जिल्हा परिषद शाळा बाभुळसर बुद्रुक यांना देण्यात येणार आहे, असे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश चव्हाण यांनी सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)