शिरूरमधील स्वच्छता कामाच्या बिलांची चौकशी करा

शिरुर- स्वच्छ भारत अभियानांतर्गत मागील महिन्यात शहरात स्वच्छतेच्या नावाखाली जी कामे झाली आहे. त्या कामासंदर्भात काढण्यात आलेल्या बिलांची चौकशी त्रयस्त संस्थेमार्फत करा, अशी मागणी नगरसेवक मंगेश खांडरे यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शासनाच्या निधीचा गैरवापर करुन शहरातील आरक्षित जागा (प्ले-ग्राउंड) मुख्याधिकारी यांनी रस्ते बनविण्याचा निर्णय घेतला आहे. जे रस्ते नगरपरिषदेच्या ताब्यात आणि मालकीचे नसताना अशा रस्त्यांवर टाकलेल्या निधीच्या गैरव्यवहाराच्या निधीची चौकशीची मागणी करुन वरील सर्व बाबींच्या कागदपञांची मागणी केली असताना गेल्या तीन महिन्यांपासून नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारचे कागदपञे उपलब्ध करुन देण्यात आलेले नाहीत. हा नगरसेवकांचा अवमान असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी आणि लेखापरिक्षण करुन कारवाई करण्याची मागणी खांडरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, शिरुर नगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करुन विशेष लेखापरिक्षण करावे. तसेच राज्यपालांच्या आदेशानुसार राज्यातील नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा प्रत्येक महिन्यात घेण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली असतानाही शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी अधिसूचनेचे उल्लंघन करुन त्यांच्या मर्जीनुसार आणि वेळेनुसार सभा आयोजित केल्या आहेत, असा आरोप नगरसेवक मंगेश खांडरे यांनी केला आहे. या संबंधी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे निवेदन देताना मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महबुब सय्यद, रिक्षा पंचायतचे अध्यक्ष अनिल बांडे, मनविसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)