शिरूरमधील बालाजी स्कूलमध्ये आरोग्यविषयी मार्गदर्शन

कोरेगाव भीमा-बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूल यांनी शाळेमध्ये दोन दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये इयत्ता 1 ली ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यी आणि विद्यार्थीनींची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यासाठी शिरुरमधील वैद्यकीय चिकित्सक डॉ.अखिलेश राजूरकर (श्रीगणेशा मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल, बाबूराव नगर शिरुर), डॉ.विजय परदेशी (आयुषमान क्‍लिनीक, बाबूरावनगर शिरुर), डॉ.अनिकेत चोपडा (आनंददीप डेंटल क्‍लिनिक, रेव्हेन्यू कॉलनी, शिरुर), डॉ.सागर केदारे (केदारे हॉस्पिटल, शिरुर) यांसह स्टाफ आदी उपस्थित होते. या सर्व तज्ञांनी आरोग्य तपासणी बरोबरच आरोग्याची काळजी कशी घ्यावी?, योग्य आहार तसेच व्यायामाविषयीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. डोळे, कान, नाक, घसा, दात याची वेळोवेळी तपासणी होणे किती महत्वाचे आहे? याचेही मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदाशिव आण्णा पवार, संस्थेच्या शैक्षणिक संचालिका शुभ्रा लाहिरी, सरव्यवस्थापक प्रदीप लांजेवार, व्यवस्थापक सुनील शिंदे, बालाजी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य गणेश मिटपल्लीवार, उपप्राचार्य वीरभद्र गौकोंडे, जनसंपर्क अधिकारी सोनाली परदेशी, बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या समन्वयक धनश्री पांडे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी या शिबिरासाठी उपस्थित होते. गिरीष हारके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर संदीप भालेराव यांनी सर्वांचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)