शिरूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुविधांचा अभाव

शिरूर – शिरूर तालुक्‍यात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत ना खेळाचे मैदान, ना पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालयाचा अभाव, भौतिक सुविधांचा अभाव असून मध्यांनभोजन व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. तर अनेक शाळांमध्ये शिक्षक वेळेवर येत नाहीत. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. तर अनेक शाळांच्या दुरवस्था झाली आहे. वर्ष संपत आले तरी या शाळांवर शिक्षण विभागाचा कुठलाही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.

शिरूर तालुक्‍यात जिल्हा परिषद शाळा असून यापैकी अनेक शाळांत वर्ग खोल्यांचीही दयनीय अवस्था आहे. यामध्ये बसायला नीट वर्ग नाहीत. तर शौचालय सुविधाही नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या मुलींची कुचंबणा होत आहे. शिरूर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद शाळा आहेत. या शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक वर्ग भरला आहे. परंतु अनेक शाळांमध्ये शिक्षक येत नसल्याचे तक्रारी आहेत. तर त्यांच्या जाण्या-येण्याच्या वेळा निश्‍चित नाहीत, अशीच परिस्थिती आहे. शासनाने विद्यार्थ्यांना मोफत मध्यान्न भोजन व्यवस्था सुरू केली आहे. यात विद्यार्थी यांना अन्न शिजवून दिले जाते. परंतु अनेक शाळांमध्ये शिजवलेले अन्न अतिशय निष्कृष्ट दर्जाचे असते. त्यामुळे याचा विद्यार्थी यांना त्रास होऊ शकतो. परंतु याकडे लक्ष देण्यास कोणाला वेळ नाही, अशी परिस्थिती आहे.

या शाळा आणि शिक्षक यांच्या बद्दल शिक्षणधिकारी यांच्याकडे कोणी तक्रार घेऊन गेले की, या शाळांबाबत मात्र नेहमीच शिक्षणाधिकारी मवाळ धोरण ठेवत असल्याचे दिसून येत आहे. सध्या शिरूर तालुका शिक्षण विभागाच्या वरदहस्तमुळे तर जिल्हा परिषद शाळा मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष नसल्याचे दिसून येते. कुठल्याही सुविधा विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे भयावह चित्र आहे. यावर शिक्षण खाते काय करतंय? त्यांचे याकडे लक्ष आहे की नाही? की शिक्षण खाते पाट्या टाकण्याची कामे करीत आहे? असा प्रश्‍न अनेकांना पडत आहे. सध्या गावोगावी इंग्रजी माध्यम शाळा सुरू झाल्या असून या शाळांमध्ये योग्य पात्रतेचे शिक्षक शिकवताना आढळत नाहीत. तसेच कमी शिक्षण घेतलेले शिक्षक काही शाळेत शिकवताना आढळतात. ते कमी पगारात चांगली गुणवत्ताही देतात.

मग, जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक असताना गुणवत्ताकडे दुर्लक्ष का होते? हा संशोधन करण्याचा विषय आहे. सध्या नागरिकांची मानसिकता ही आपला मुलगा इंग्रजी शाळेत शिकावे, अशी झाली आहे. जिल्हा परिषद शाळांना आता इंग्रजीचा लूक देऊन शिक्षकांची मानसिकता बदलने गरजेचे आहे, अन्यथा यापुढील काळात या शाळांना कुलूप लावण्याची वेळ येईल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)