शिरुर पोलीसांकडुन 7 आरोपींवर मोक्का

शिरुर- शिरुर पोलीसांनी 7 आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) या कायद्याखाली कारवाई केली असल्याची माहिती शिरुर पोलीसांनी दिली.
शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संविदणे येथे लाकडी दांडके, लोखंडी गज, कुऱ्हाड याचा धाक दाखवून लुटमार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रमेश नरसिंग भोसले (रा.लोणी व्यंकनाथ, ता.श्रीगोंदा), रामदास उर्फ चिवडया उर्फ शिवा गोपाळ काळे (रा. निघोज), पप्पु आलम काळे (रा. निघोज), राघेश उर्फ राघ्या संजय काळे (रा. रा. गुणोरे, ता. पारनेर), राहुल अर्पण भोसले, बाळु झारु भोसले, गिरीश आलम काळे (रा. निघोज) यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीसांनी रामदास उर्फ चिवडया उर्फ शिवा गोपाळ काळे, पप्पु आलम काळे, राघेश उर्फ राघ्या संजय काळे, गिरीश आलम काळे यांना अटक करण्यात आली होती.
त्यामुळे शिरुर पोलीसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई होण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे मोक्का अंतर्गत कारवाई होण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता.
त्याबाबत पडताळणी झाल्यानंतर पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी मोक्का अंतर्गत वाढीव कलम लावण्यास मंजुरी दिली. त्यानंतर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांनी करुन गुन्ह्यातील अटक व फरारी आरोपींविरुद्ध मोक्का कोर्टात दोषारोपपत्र पाठविणेकरिता अप्पर पोलीस महासंचालक यांची पूर्वपरवानगी प्राप्त केली. या गुन्ह्यातील रामदास उर्फ चिवडया, पप्पु आलम काळे, राघेश उर्फ राघ्या संजय काळे, राहुल अर्पण भोसले, बाळु झारु भोसले, गिरीश आलम काळे (रा. निघोज) यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे यांच्याविरुद्ध सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्रत्र मोक्का कोर्टात दाखल करण्यात आले. यापुढेही शिरुर पोलीसांकडून संघटित गुन्हेगारांचे रेकॉर्ड तयार करुन कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)