शिरुर पूर्व भागात उत्साहात विसर्जन मिरवणूक

न्हावरे: शिरुरच्या पूर्व भागात सर्वत्र तसेच न्हावरे परिसरात सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशाचे विसर्जन पार पडले. विशेष म्हणजे सर्व गणेश मंडळांनी एकत्रीत विसर्जन मिरवणुकीचे आयोजन केले होते. याबाबत शिरुर पोलिसांच्या वतीने तसे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांचे विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीवर लक्ष होते. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
मांडवगण, वडगाव रासाई,नागरगाव, कुरूळी,आंधळगाव, आलेगाव, कोकडेवाडी, गणेशनगर, वडखेलवाडी, सर्वत्र शांततेत विसर्जन पार पडले. करडे,आंबळे येथे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक असल्याने या परिसरात विसर्जन मिरवणुकीचा उत्साह कमी पाहायला मिळाला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)