शिरुर तालुक्‍यातील ओढे-नाले कोरडे

वाड्या-वस्त्यांवर पाणी टंचाई : विहिरीच्या पाणी पातळींने तळ गाठला

शिक्रापूर – दुष्काळी समजल्या जाणाऱ्या शिरूरच्या पश्‍चिम भागात गेल्या अनेक वर्षीपासून उन्हाळात भेडसावत असलेला पाणी प्रश्न सतावत आहे. या भागातील अनेक गाव आणि वाड्यावस्त्यांना एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या भागतील ओढे-नाले कोरडे पडले आहेत. अनेक ठिकाणी विहिरीच्या पाणी पातळींने तळ गाठला आहे.

शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील पाबळ, कान्हूर मेसाई, केंदूर, धामारी, खैरेनगर, मिडगुलवाडी आदी भागतील पाणी पातळी खालावली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच येथील जनावरांना चारा आणि पाण्याचा प्रश्न लवकरच भेडसावणार आहे. सध्या जलस्त्रोत असलेल्या अनेक विहिरींमधील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. पाबळ, केंदूर, धामारी तसेच परिसरात मागील 15 वर्षी पूर्वी जानेवारी महिन्यातच दुष्काळाला सामोरे जावे लागत होते. त्यावेळी अनेक आंदोलनानंतर या भागाला वरदान ठरलेला थिटेवाडी बंधारा पूर्ण झाला. या भागतील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाला असला तरी उन्हाळ्यात या भागात आजही काही ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
सध्या बंधारा क्षेत्रातून विहिरी घेऊन पाबळ, धामारी, केंदूर, खैरेनगरसह आदी भागात पिण्याच्या पाण्याच्या नळपाणी पुरवठा योजना केल्या आहेत. या योजनाच्या विहिरी ऐन उन्हाळ्यात कोरड्या पडत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत चालला आहे. या भागात मागील वर्षी मोठ्या प्रामाणत जलयुक्त शिवाराची कामे झाली. यासाठी लाखो रूपये खर्च करून ओढे-नाले याचे खोलीकरण करण्यात आले. धामारी येथे सर्वात जास्त कामे करण्यात आली. सध्या अनेक ठिकाणी ओढे-नाले पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. किमान फेब्रुवारीपर्यंत तरी पाणीसाठा जलयुक्तमुळे राहिला. परंतु सध्या पाणी संपले असून एप्रिल-मे महिन्यात पाण्याची मोठी टंचाई जाणवेल, अशी सध्याची परिस्थिती आहे, असे धामारीचे माजी सरपंच संपत कापरे यांनी सांगितले.

मागील काही वर्षांपासून कावडी बंद झाल्या. तर काही वर्षापूर्वी या भागात कावडीने पाणी विकत घ्यावे लागत होते. तीन ते पाच रुपयाला पंधरा लीटर पाणी मिळत होते. काहीसे हे बंद झाले असून जुन्या आठवणी सांगताना अनेक महिलांनी समाधान व्यक्त केले. पण दरवर्षी मार्च-एप्रिल या दोन महिने येणारी पाण्याची अडचण शासनाने या भागासाठी कायमस्वरुपी सोडवावी, अशी मागणी अनेकांनी यावेळी व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)