शिरुरचे मंडळ अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

शिरूर – वाळूच्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी दर महीना दहा हजार रुपयांची मागणी करणाऱ्या शिरुरच्या मंडलाधिकारी सतीश रामदास पंचरास याला लाचलुचपत पथकाचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी, संबंधित तक्रारदाराचा वाळूचा व्यवसाय असून वाळूच्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी मंडलाधिकारी सतीश रामदास पंचरास यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची मागणी केली होती. संबंधिताने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविषयी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी गुरुवारी (दि.16) रात्री पावणेदहाच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परिसरात सापळा रचून पंचरास यांना लाचेसह रंगेहाथ पकडले. या कारवाईमध्ये लाचचुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनिता साळुंके, अरुण घोडके आदींनी सहभाग घेतला होता. शिरूर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा महसूल विभागाच्या पुणे ते शिरूरच्या खात्याच्या वरदहस्ताने सुरू आहे. यासाठी पदानुसार हप्ते घेतले जातात. या हप्त्यामुळे वाळूमाफियाही मुजोर झाले आहेत. आता त्याचा प्रत्यय आला आहे, तरी गेल्या दोन वर्षात महसूल विभागाचे अनेक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले असतानाही या विभागात सुरू असलेला भ्रष्टाचार कमी होत नाही, ही गंभीर बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)