शिराळ चिचोंडी येथे 30 जून रोजी मोफत कॅन्सर तपासणी, उपचार शिबिर

आनंदऋषीजी हॉस्पिटल, नामको कॅन्सर हॉस्पिटलचा उपक्रम
नगर – जैन सोशल फेडेरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ऍण्ड हार्ट सर्जरी सेंटर व नाशिकस्थित नामको कॅन्सर हॉस्पिटल, श्री आनंद जैन मेडिकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी तालुक्‍यातील शिराळ चिचोंडी येथे मोफत कॅन्सर तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिराळ चिचोंडी येथील श्री आनंद चिकित्सालयात शनिवार दि.30 जून रोजी दुपारी 12 ते 2 यावेळेत हे शिबीर होणार आहे. या शिबिरात कॅन्सर तज्ज्ञ डॉ.विनायक शेणगे रूग्ण तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जैन सोशल फेडरेशनच्यावतीने देण्यात आली.
नगरमधील आनंदऋषीजी हॉस्पिटलने आरोग्यसेवेचा विस्तार करीत नाशिकस्थित नामको कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या आजारावरील उपचार सुविधांचा लाभ ग्रामीण भागातील रूग्णांपर्यंत पोहचविण्यासाठी शिराळ चिचोंडी येथे मोफत कॅन्सर तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व प्रकारचे कॅन्सर उपचार, ब्रेकीथेरपी, ब्लड कॅन्सर, पॅलीयेटिव्ह कॅन्सर उपचार, सिम्टोमॅटिक कॅन्सर उपचार, लहान मुलांचे कॅन्सर उपचार आदी उपचार सुविधा उपलब्ध असणार आहेत. नगरधील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे केमोथेरपी मोफत उपलब्ध आहेत.तर सर्व प्रकारचे रेडिओथेरपी किरणोपचार (लाईटचे उपचार) नाशिक येथील नामको हॉस्पिटलमध्ये मोफत उपलब्ध आहेत. पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत कॅन्सर शस्त्रक्रियांची सुविधा आहे. या शिबिरासाठी येताना रूग्णांनी जुने रिपोर्टस फाईल सोबत आणावयाची आहे. शिबिराची नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी रूग्णांनी डॉ.अभयकुमार भंडारी (मो.9423468233), विश्‍वजीत गुगळे , डॉ.शांतीलाल कटारिया , डॉ.सचिन गांधी , हिरालाल गुगळे , कमलेश गुगळे , डॉ.एस.के.बोरूडे यांच्याशी अथवा आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे दूरध्वनी क्रमांक 0241-2320473 ते 76 अथवा 9404399911 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)