शिरापूर शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात

देऊळगावराजे- शिरापूर (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 72 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातून विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून देशासाठी बलिदान केलेल्या शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. गावातील लहान मुलांसाठी खेळाचे मैदान ग्रामस्थांनी स्वखर्चातून तयार केल्याने तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी या कामाचे कौतुक केले. ग्रमस्थांनी एकोपा ठेवला तर कुठले काम अशक्‍य नाही असे मत तहसीलदारांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी सोमवंशी यांच्या हस्ते मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी दौंडचे निवासी नायब तहसीलदार धनाजी शेळके,गटविकास अधिकार गणेश मोरे, हरिभाऊ ठोंबरे, सचिव सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, चेअरमन बाळासाहेब घोलप, सरपंच सुला बर्डे, उपसरपंच केशव काळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव ठोंबरे, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत सातव, शहाजी काळे, सोमनाथ सातव, रामभाऊ होलम, सुरेश डाळिंबे, योगदान माझेही या ग्रूपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)