शिरापूरला 12 लाखाची वाळूचोरीप्रकरणी 12 जणांवर गुन्हे दाखल

देऊळगावराजे- उपजिल्हाधिकारी रमेश काळे आणि इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी दौंड तालुक्‍यातील नायगाव आणि वाटालूज येथे अवैध वाळू उतख्तनन करणाऱ्या बोटींवर कारवाई केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या दौंड महसूल प्रशासनाने शुक्रवारी (दि.23) शिरापूर (ता.दौंड) येथील भीमा नदीपत्रातून 12 लाख रुपये किंमतीची 200 ब्रास वाळूचोरी केल्याप्रकरणी 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती ठाणे अंमलदार कल्याण शिंगाडे यांनी दिली.
याबाबत शिरापूरचे तलाठी हरिचंद्र फरांदे यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत आरोपी मोहन शिवराम नवले, राहुल अशोक भळगट, संभाजी देवराम कापसे, बाबासो मारुती आवचार, भाऊसाहेब भानुदास होलम, नाना भगवान सातव, शिवाजी नाना कापसे, संतोष प्रकाश खळदकर, आकाश एकनाथ कापसे, राजेंद्र जालिंदर काटकर (सर्व राहणार शिरापूर, ता. दौंड, जि. पुणे), अनिल काशीनाथ सूर्यवंशी (रा. देऊळगावराजे) आणि भैय्या शितोळे (पूर्ण नाव माहीत नाही). हे बोटींच्या सहाय्याने वाळू उत्ख्तनन करत होते. मंडलाधिकारी संजय स्वामी आणि तलाठी हरीचंद्र फरांदे तेथे गेले असताना ते लोक नगरच्या दिशेने बोटी घेऊन पळून गेले, असा उल्लेख केला आहे. त्यांनी अंदाजे 200 ब्रास वाळू प्रतिब्रास 6 हजार रुपये प्रमाणे 12 लाख रुपयांची वाळूचोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सुमारे 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)