शिरसवडीच्या सरपंचपदी लता गावडे

वाघोली – शिरसवडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लता ज्ञानेश्वर गावडे यांची निवड झाली. सरपंचपदासाठी सुरेखा खेडेकर, देवीश्री नागवडे, लता गावडे यांनी अर्ज सादर केले होते. ही निवडणूक लता गावडे आणि सुरेखा खेडेकर यांच्यात झाली. यात गावडे यांना 5, तर सुरेखा खेडेकर यांना 3 मते मिळाली. लता गावडे या पंचवार्षिक निवडणुकीतील तिसऱ्या महिला सरपंच आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी किशोर शिंगोटे यांनी कामकाज पाहिले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक माणिकराव गोते, माजी सरपंच संदीप गोते, उपसरपंच बाळासाहेब गावडे, सतीश नागवडे, माजी सरपंच दीप्ती नागवडे, प्रमोद गोते, हवेली तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य प्रमोद गावडे, किरण शिंदे, किशोर शिंदे, माजी सरपंच मनीषा चितळकर, रमेश कदम, संतोष गोते, अंकुश गोते, मधुकर नागवडे, महादेव चितळकर, दौलत चितळकर, नितीन गावडे, राजू गोते, संजय मुरकुटे, दत्तात्रय मुरकुटे, देविदास निकाळजे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)