शिरसटवाडी जळीतग्रस्त कुटुंबाची पाहणी

निमसाखर- शिरसटवाडी (ता. इंदापूर) येथील वाघमारे बंधुंच्या घराला आग लागून गणेश वाघमारे या अडीच वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला होता.इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी जळीतग्रस्त घराची पाहणी करुन शासकीय पातळीवर आवश्‍यक ती सर्व मदत करण्याचे आश्‍वासन मेटकरी यांनी यावेळी दिले.
पागळेवस्ती येथे राहणाऱ्या रामचंद्र वाघमारे व साहेबराव वाघमारे यांची घरे शेजारी आहेत. या घरांना अचानक आग लागून घरातील संसारपयोगी साहित्य आगीत भस्मसात होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीत रामचंद्र वाघमारे यांच्या घरातील हनुमंत वाघमारे यांचा अडीच वर्षांचा मुलगा गणेश वाघमारे याचा दुर्दैवी अंत झाला. याचबरोबर वाघमारे कुटुंबातील दोन्ही घरे जळून खाक झाली. दरम्यानच्या काळात आमदार दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, लालासाहेब पवार, प्रवीण माने,संतोष ननवरे, फिरोज पठाण, नितीन भुजबळ, रमेश नलवडे, ग्रामसेविका व्ही. एल. पाटील, तलाठी कपील थोरात यांसह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन वाघमारे कुटुबांचे सात्वंन केले. तहसीलदार सोनाली मेटकरी म्हणाले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीबरोबरच विशेष बाब म्हणून घरकुल देण्याकरीता सहकार्य करणार आहे. इतर वस्तुबरोबर शासकीय कागदपत्रे (मतदान ओळखपत्र, आधारकार्डसह अन्य) जळाल्याने नव्याने मिळवून देण्याबरोबर सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठीही सहकार्य करण्याच्या सूचना यावेळी तलाठी व ग्रामसेविका यांना दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)