शिरसगाव येथे आज रस्ता सुरक्षा पंधरवडा

File photo

शिरसगाव – श्रीरामूपर तालुक्‍यातील शिरसगाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे परिवहन विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्‍त विद्यमाने दि.23 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता 29 वा राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा पंधरवडा होणार आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्‍पाक अहमद खान, पोलीस निरीक्षक संपत शिंदे, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत पथवे व सर्व पोलीस व परिवहन अधिकारी, कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य प्रकाश कुलथे, अध्यक्ष श्रीरामपूर तालुका वकील संघ वाय. के. शेख, बाळासाहेब आगे, डॉ. गोरख बारहाते, सुनील मुथा आदी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)