शिरसगावला विविध विकासकामांचे भूमिपुजन

मांडवगण फाराटा- शिरसगांव काटा (ता. शिरूर) येथे पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा विषय समितीच्या सभापती सुजाता पवार यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ माजी आमदार आणि रावसाहेब पवार घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. अशोक पवार यांच्या हस्ते झाला.
यावेळी बोलताना अशोक पवार म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासकामांवर भर दिला जात आहे. जास्तीत जास्त निधी शिरूरच्या पूर्व भागाला उपलब्ध करून दिला जाईल. विद्यमान आमदारांना चासकमान पाण्याचे, घोडच्या पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने या पाण्यावर अवलंबून असलेला शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या दुष्काळाचं सावट निर्माण झाल्याने शेतकरी आणखीच अडचणीत सापडला आहे, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. याप्रसंगी घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, प्रा. सुभाष कळसकर, शिरूर बाजार समितीचे संचालक विजेंद्र गद्रे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक सुधीर फराटे, दत्तात्रय फराटे, सरपंच सतीश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी जगताप, शोभा कदम, संजय शिंदे, प्रकाश जाधव, शिवाजी सोनटक्के, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कदम, तंटामुक्ती अध्यक्ष विजय जगताप, माजी सरपंच रामचंद्र आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)