फलटणचे नगरसेवक कुंभार यांचा मृतात समावेश; माजी नगराध्यक्षांसह एकजण गंभीर

पुणे बेंगलोर महामर्गावर शिरवळजवळ येथे स्विफ्ट व आयशर यांचा भिषण अपघात झाला. या अपघातात दोघे जागीच ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी आहेत. मृतामध्ये फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक जगन्नाथ कुंभार यांच्यासह खो-खो संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष पांडूरंग शिंदे यांचा समावेश आहे. तर माजी नगराध्यक्ष आण्णा देशमुख यांच्यासह चालक आशिष नंदकुमार लोंढे हा जखमी झाला आहे.

कुंभार,शिंदे,देशमुख,लोंढे हे फलटणहून पुण्याला कामानिमीत्त निघाले होते. चालक लोंढे याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने शिरवळ येथील आयसीआयसी बॅंकेजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. पुण्याच्या दिशेने निघालेल्या एम एच 04 एफ जे 8038 या मालवाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकला त्यांची स्विफ्ट एमएच 11 सीजी 9314 या कारने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये जगन्नाथ गणपत कुंभार (वय,65 रा.लक्ष्मीनगर,फलटण) व पांडूरंग गोपाळा शिंदे (वय 78,रा. भडकमनगर,फलटण) यांचा जागीच मृत्यू झाला.

तर आण्णा देशमुख व आशिष नंदकुमार लोंढे (वय 29 रा. फलटण) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ.अभिजीत पाटील, शिरवळ पोलिस ठाण्याचे स.पो.नि. भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ महगामार्गावर झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी सुरळीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)