शिरवळ येथे केदारेश्वर मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्साहात साजरी

शिरवळ – शिरवळ येथील केदारेश्वर तरुण मंडळाच्या वतीने गोकुळ अष्टमी निमित्त भव्य दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या वेळी प्रमुख उपस्थिती सातारा जिल्ह्याचे भाजप चे नेते पुरुषोत्तम जाधव व सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य व स्थायी समिती सदस्य उदय दादा कबूले हे होते. केदारेश्वर तरुण मंडळाच्या वतीने हि दही हंडी फोडण्यात आली. या वेळी बाल गोपाळ तसेच शिरवळ परिसरातील अनेकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली. मोठ्या जल्लोषात बाळ गोपाळांनी आनंद लुटला. या वेळी उपस्थित प्रमुखांचे स्वागत करण्यात आले.

आगामी काळात खंडाळा तालुक्‍याच्या विकासासाठी व स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्यासाठी तुम्ही सर्वजण माझ्या पाठी मागे उभे राहा निवडणूक येतील जातील आपण खंडाळा तालुक्‍याचे भूमिपुत्र आहोत आपण खंडाळा तालुक्‍याच्या विकासासाठी वेगळा राजकारण न करता तालुक्‍यात अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे.आगामी काळामध्ये जो काही प्रसंग येईल त्याला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी तयारी करा असे आवाहन या वेळी तरुणांना पुरुषोत्तम जाधव यांनी केले.

जिल्हा परिषद सदस्य उदय कबूले बोलले कि केदारेश्वर मंडळ तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील तसेच त्यांनी सर्व बाळ गोपाळांना शुभेच्छा दिल्या. या वेळी शिरवळ चे माजी सरपंच दशरथ निगडे,मंडळाचे अध्यक्ष्य संपत मगर ,ग्रा.सदस्य प्रकाश परखंदे,विकास तांबे सागर पानसरे,सागर शेलार,नवनाथ भरगुडे, किरण राऊत,अमृत पिसाळ रंगनाथ शेटे,व अनेक मान्यवर उपस्थित होते. यांचे आभार मंडळाचे उपाध्यक्ष शंकर कबूले यांनी मानले

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)