शिरवळमध्ये सशस्त्र वावरणाऱ्या युवकाला अटक

शिरवळ, दि. 30 (प्रतिनिधी) – शिरवळ परिसरात सशस्त्र वावरत असलेल्या एका युवकाला पोलिसांनी शिताफिने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तलवार, कुकरीसारखे धारदार शस्त्र आणि दुचाकीसह 50 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, संबंधित युवक हा पुणे जिल्ह्यातील भोर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ, ता. खंडाळा याठिकाणी दुचाकीवर एक युवक तलवार घेऊन वावरत होता. याबाबतची माहिती शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस हवालदार अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड, विनोद पवार यांच्या पथकाने शिरवळ येथील केदारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा लावला. दरम्यान, एका बांधकाम सुरु असलेल्या बिल्डींगसमोरील रस्त्यावरून एका दुचाकीवर एक युवक संशयास्पद येत असताना पोलिसांनी संबंधित युवकाची दुचाकी थांबवून विचारणा केली असता दुचाकीवर असणारा युवक हा दुचाकी सोडून पळून जाऊ लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस हवालदार स्वप्नील दौंड,विनोद पवार यांनी पाठलाग करत मोठ्या शिताफीने त्या युवकाला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी खाक्‍या दाखवताच व अंगझडती घेतली असता अक्षय विलास शिंदे (वय 27 रा. नवी आळी,भोर जि. पुणे) या युवकाकडून शिरवळ पोलिसांनी 58 सेमी लांब, 5 सेमी रूंदीची दोन्ही बाजूने धार व 15 सेमी मूठ असलेली धारदार तलवार त्याचप्रमाणे 24.5 सेमी लांब, 4 सेमी रुंद दात्रे असलेली व 12 सेमी लांब मुठ असलेली कुकरी हस्तगत करत दुचाकीसह पन्नास हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित युवकाला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)