शिरवळजवळ भरधाव कारच्या धडकेत वृद्ध ठार

शिरवळ  – शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीमध्ये कारने महामार्ग ओलांडणाऱ्या केशव शंकर सोनावणे (वय 78 रा. शिंदेवाडी, ता. खंडाळा) यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सोनावणेंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिंदेवाडी येथील केशव सोनावणे हे शिरवळ याठिकाणी काही कामानिमित्त आले होते. यावेळी शिरवळ गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या महामार्गावर केशव सोनावणे महामार्ग ओलांडत होते. यावेळी भरधाव कारने (एमएच 05 -बीएस 1306) महामार्ग ओलांडणाऱ्या त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत केशव सोनावणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एल.डी.केदारी करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)