शिरगाव येथे विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

सोमाटणे – शिरगाव येथील शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळा व आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालयातील सुमारे 450 विद्यार्थ्यांना जागतिक जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात पाण्यात होणारा बदल व त्यामुळे जंतांचे प्रमाणात वाढ होते. खेळून आल्यावर, शौचालयावरून आल्यानंतर विद्यार्थी हे व्यवस्थित हात धूत नाहीत, त्यामुळे सतत आजारी पडत असतात.

प्राथमिक आरोग्य विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना या जंतनाशक गोळ्याचे मोफत वाटप करण्यात आले. गोळ्या खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी काळजी घेण्यात आली. शिरगाव येथे आशा सेविका मनिषा अरगडे व आम्रपाली गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना गोळ्यांचे वाटप केले. जंतामुळे होणाऱ्या आजारांची माहिती दिली. त्यावर घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)