शिमल्याच्या सफरचंदाची आवक वाढली

पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील फळ बाजारात शिमल्यावरून सफरचंद मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. परंतु, पावसामुळे फळाला उठाव नसल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

बाजारात गावरान संत्री दाखल झाली आहेत. मात्र त्यांची आवक जास्त झाली नाही. येत्या काही दिवसात गावरान संत्र्याची आवक वाढणार असल्याची शक्‍यता विक्रेत्यांनी बोलून दाखवली. तसेच बाजारात पपईची आवक स्थिर असून त्याचे भाव ही “जैसे थे’ असल्याचे दिसून आले. केरळमधून अननसाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते. मात्र, केरळमध्ये पूराने थैमान घातल्याने आवक घटल्याची माहिती फळ विक्रेता उद्धव काकडे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या आठवड्यातही डाळींबाची आवक जास्त झाली आहे. त्याच्या भावामध्ये कोणतीही वाढ झाली नाही. कलमी पेरू, सिताफळ आणि मोसंबी यांची आवक आणि भाव स्थिर आहेत, अशी माहिती फळ विक्रेता कुमार शिरसाठ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)