शिफारस – एचडीएफसी इक्विटी फंड

एक जानेवारी १९९५ ला सुरू झालेला एचडीएफसी इक्विटी फंड गेली २३ वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करीत आहे. गेल्या १० वर्षांतत्याने१४.९४ टक्के परतावा दिला आहे. यासोबतच्या बेंचमार्क इंडेक्सचा(निफ्टी इंडेक्स) परतावा मात्र १०.७३ टक्के इतका आहे. ज्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करावयाची आहे, त्यांच्यासाठी हा फंड अतिशय चांगला आहे. हा फंड मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. त्यामुळे बाजारातील मोठ्या चढ-उतारापासून गुंतवणूकदांचे संरक्षण होते. २०१४, २०१६ आणि २०१७ मध्ये चांगला परतावा देणाऱ्या फंडांत हा फंड आघाडीवर आहे.

गुंतवणूकदारांच्या भांडवलाची वृद्धी करून देण्याची क्षमता असणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये हा फंड प्रामुख्याने गुंतवणूक करतो. या फंडांच्या मालमत्तेचे बाजारमूल्य २१ हजार ३७५ कोटी रुपये झाले आहे. यावरून याच्या प्रचंड विस्ताराची कल्पना येऊ शकते. गेल्या २३ वर्षांत या फंडाने सरासरी १९ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. या फंडाची एनएव्ही रुपये १० वरून ६१६.६५ रुपये प्रतियुनिटपर्यंत पोचल्याचे पाहून प्रथमदर्शनी हा फंड महाग वाटू शकतो. मात्र, म्युच्युअल फंडाची एनएव्ही आणि त्यातील गुंतवणुकीतून मिळणारा फायदा याचा संबंध नसतो, तर तो फंड ज्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो, त्या शेअरच्या बाजारभावावर गुंतवणूकदारांचा फायदा अवलंबून असतो.ज्यांनी या योजनेत सुरुवातील रु.एक लाख गुंतवले होते त्याचे सध्याचे बाजारमूल्य रु.६० लाख रुपयांपेक्षा जास्त झालेले आहे. तसेच ज्यांनी या योजनेत सुरुवातीपासून दर महा रु.५००० ची गुंतवणूक एस.आय.पी. माध्यमातून केली आहे व जी अजून चालू ठेवली असेल तर आजपर्यंत एकूण गुंतवणूक झाली रु.१४.१० लाख व सध्याचे मुल्य आहे सुमारे रु.३ कोटी २० लाख रुपये. जून २००३ पासून फंड मॅनेजर हे प्रशांत जैन आहेत.

सध्या हा फंड कोणत्या कंपन्यांत गुंतवणूक करतो, त्या कंपन्यांची यादी जरी पाहिली तरी तो सातत्याने चांगला परतावा का देतो, हे लक्षात येईल.

या फंडाच्या पोर्टफ़ोलिओत सध्या असलेल्या कंपन्या अशा – आयसीआयसी बँक, एसबीआय, इन्फोसिस, लार्सन, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयटीसी, एनटीपीसी, गेल, पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया. एकूण पन्नासावर कंपन्यांत हा फंड गुंतवणूक करत असला तरी आघाडीवरील पाच कंपन्यांत ४० टक्के रक्कम गुंतवून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देण्यात हा फंड यशस्वी झाला आहे.

गेल्या ऑक्टोबरच्या अखेरीस शेअरबाजार सातत्याने खाली येत होता, त्यावेळीया फंडाची एनएव्हीही५६० ते ५८० रुपये इतका कमी झाला होता, पण आता तो ६०० पेक्षा वर गेला असून गेल्या शुक्रवारी तो ६१६.६५ रुपये इतका झाला आहे. याचा अर्थ याकाळात बाजार पडला तेव्हा एकरकमी गुंतवणूक केली असती तर तिचा लगेच चांगला परतावा मिळाला असता. किंवा ज्यांनी एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केली असती तर त्यांचाही फायदा झाला असता. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्याची एनएव्ही ६८७ रुपये होती, तरजानेवारी १४ ला ती केवळ ३५० रुपये होती.पाच वर्षांपूर्वी ज्यांनी या फंडात एकरकमी १० हजार रुपये गुंतविले आहेत, त्याचे मूल्य आज २१ हजार १४१ आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)